Select Page

बारामतीत लँडिंगआधी पायलटने शेवटचं काय म्हटलं?, नेमकं काय घडलेलं, धक्कादायक माहिती समोर

बारामतीत लँडिंगआधी पायलटने शेवटचं काय म्हटलं?, नेमकं काय घडलेलं, धक्कादायक माहिती समोर


उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर आज (29 जानेवारी) बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह अनेक महत्वाचे नेते अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत.

अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी कालपासून बारामतीत मोठा जनसागर लोटलाय.  अजित पवारांच्या धक्कादायक अपघाताची माहिती मिळताच पवार कुटुंबावर जणू वीजेचा लोळ कोसळला. (Ajit Pawar Dead Plane Crash Baramati)

अजित पवार खाजगी विमानाने काल (28 जानेवारी) सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. यावेळी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान विमानाचा अपघात झाला. यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला.

सकाळी 8.45 च्या दरम्यान ही सगळी घटना घडली. या घटनेदरम्यान, बारामतीत लँडिंगपूर्वी पायलटने शेवटचं काय म्हटलं?, सरकारच्या प्राथमिक अहवालात नेमकं काय आहे?, याबाबत माहिती समोर आली आहे. 

सदर विमान 28 जानेवारी रोजी सकाळी 8.18 वाजता पहिल्यांदा बारामतीच्या संपर्कात आलं. या अहवालानूसार वैमानिकांना सांगण्यात आलं की सध्या वारा फार नाही आणि दृश्यमानता साधारण 3000 मीटर इतकी आहे. त्यानंतर विमानातील पायलटने सांगितलं की ते रनवे क्रमांक 11 च्या दिशेने येत आहेत. पण त्यांना रनवे दिसत नाहीय.

नंतर पायलटने  पुन्हा एटीसीला सांगितलं की रनवे दिसू लागला की सांगतो. त्यानंतर 8.43 वाजता रनवे क्रमांक 11 लँडिंगसाठी सज्ज करण्यात आला. मात्र पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर काही क्षणातच धावपट्टीच्या डाव्या बाजूला ज्वाळा आणि धुराचे लोट उठताना दिसले, असं एटीसीवर काम करत असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 

Advertisement

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!